Sachin Magade

+91 9822994505
magadesachin@gmail.com

Dear Zindagi by Sachin

मी बऱ्याचवेळा ऐकलंय की , हे जग चांगल्या माणसांमुळे टिकून आहे . परंतु इथे वस्तुस्थिती पाहीली तर लक्षात येईल की , चांगल्या माणसांनाच खूप त्रास होतो किंबहुना त्यांनाच खूप संघर्ष करावा लागतो कारण ती लोकं तत्वनिष्ठ असतात आणि त्यांना तत्वांशी तडजोड करायला जमत नाही, किंवा चुकीच्या प्रवाहात स्वतःला वाहून न्यायला त्यांना आवडत नाही .

ते आपल्या विचारांवर ठाम असतात, याचा अर्थ असा नाही की ते कमजोर असतात किंवा परिस्थितीनुसार लवचिक नसतात, मुळात त्यांनाही परिस्थितीचं ज्ञान असतेच पण प्रगल्भतेच्या कसोटीतून त्यांनी आपली मते ठरवलेली असतात. ती मते विवेकावर आधारलेली असतात म्हणून तीच मते पुढे मान्यता बनतात, कदाचित म्हणूनच त्याला तत्त्व ” म्हणतात . परंतु या विचारशून्य व भरकटलेल्या दुनियेत याची किंमत कमी असेल किंवा काहींच्या मते शून्य असेल आणि तेही योग्य असू शकतं कारण ते या जगाला त्यांच्या चष्म्यातून पाहतात आणि त्यानुसार आपली मते ठरवतात , पुढे तीच मते त्यांच्याही मान्यता बनतात , त्यामुळे क्षणभंगूर गोष्टींमध्ये ते अडकतात म्हणूनच ते पूर्ण क्षमतेने जीवन न जगता , एवढं दर्जेदार आयुष्य साधारणपणे व्यतीत करतात .

आपल्यासोयीनुसार प्रत्येक गोष्टींचा अर्थ लावाल तर नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल परंतु क्षणिक … त्याने शाश्वत आनंद नाही भेटणार . शाश्वत आनंद मिळवण्यासाठी दोन गुण आवश्यक असतात ते म्हणजे पारदर्शकता व सत्य. नकारात्मकतेने बरबटलेल्या या जगात बिघडायला नव्हे , तर योग्य व सत्याच्या मार्गावर चालायला खरी हिंमत लागते आणि ती हिंमत या चांगल्या माणसांमध्ये असते म्हणूनच कदाचित असं म्हणत असतील की हे जग चांगल्या माणसांमुळे टिकून आहे .

1 thought on “Dear Zindagi by Sachin”

  1. वस्तुस्थिती तशीच आहे चांगल वागतात त्यांना खूप त्रास होतो मी सहमत आहे. nice ब्लॉग आणि वास्तववादी शब्दांकन.

Leave a Comment